रोहितचे शतक; भारत विजयी

0
117
Indian cricket team pose with the trophy after winning the fifth one-day international cricket match against Australia at the Vidarbha Cricket Association Stadium in Nagpur on October 1, 2017. / AFP PHOTO / PUNIT PARANJPE / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत पाच एकदिवसीय सामन्याची मालिका ४-१ अशा ङ्गरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २४३ धावांचे लक्ष्य भारताने रहाणे, रोहित व विराट यांचा बळी देत पूर्ण केले. शतकी खेळी केलेला रोहित सामनावीर तर अष्टपैलू हार्दिक पंड्या मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यातील विजयामुळे भारताने पुन्हा एकदा आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.

२४३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित आणि रहाणेने सलग तिसर्‍या सामन्यात शतकी सलामी दिली. या दरम्यान त्यांनी आपली अर्धशतकेदेखील पूर्ण केली. २३व्या षटकात कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत झाला. रहाणेने ७ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. रहाणेनंतर कर्णधार कोहली आणि शर्मामध्ये ९९ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी रोहितने १०९ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह १२५ धावांची तुफानी खेळी केली. रोहितनंतर कोहलीही लगेचच बाद झाला. त्याने ३९ धावांचे योगदान दिले. कोहली परतला त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ १६ धावांची आवश्यकता होती. केदार जाधवने नाबाद ५ आणि मनीष पांडेने नाबाद ११ धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झंपाने २ आणि कुल्टर-नाईलने प्रत्येकी १ बळी घेतला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम ङ्गलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४२ धावसंख्या उभारली होती. डेव्हिड वॉर्नर आणि ङ्गिंचने अर्धशतकीय सलामी दिली. आक्रमक अंदाजात खेळणार्‍या ङ्गिंचला बाद करत पंड्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. ङ्गिंचने ३२ धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने ५३ धावांची अर्धशतकीय खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त हेडने ४२ आणि स्टोईनिसने ४६ धावा केल्या. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

धावफलक
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर झे. पांडे गो. पटेल ५३, ऍरोन फिंच झे. बुमराह गो. पंड्या ३२, स्टीव स्मिथ पायचीत गो. जाधव १६, पीटर हँड्‌सकोंब झे. रहाणे गो. पटेल १३, ट्रेव्हिस हेड त्रि. गो. पटेल ४२, मार्कुस स्टोईनिस पायचीत गो. बुमराह ४६, मॅथ्यू वेड झे. रहाणे गो. बुमराह २०, जेम्स फॉल्कनर धावबाद १२, पॅट कमिन्स नाबाद २, नॅथन कुल्टर नाईल त्रि. गो. भुवनेश्‍वर ०, अवांतर ६, एकूण ५० षटकांत ९ बाद २४२
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ८-०-४०-१, जसप्रीत बुमराह १०-२-५१-२, हार्दिक पंड्या २-०-१४-१, कुलदीप यादव १०-१-४८-०, केदार जाधव १०-०-४८-१, अक्षर पटेल १०-०-३८-३
भारत ः अजिंक्य रहाणे पायचीत गो. कुल्टर नाईल ६१, रोहित शर्मा झे. कुल्टर नाईल गो. झंपा १२५, विराट कोहली झे. स्टोईनिस गो. झंपा ३९, केदार जाधव नाबाद ५, मनीष पांडे नाबाद ११, अवांतर २, एकूण ४२.५ षटकांत ३ बाद २४३
गोलंदाजी ः पॅट कमिन्स ७-१-२९-०, नॅथन कुल्टर नाईल ९-०-४२-१, मार्कुस स्टोईनिस ४-०-२०-०, जेम्स फॉल्कनर ५.५-०-३७-०, ऍडम झंपा ८-०-५९-२, ट्रेव्हिस हेड ६-०-३८-०, ऍरोन फिंच ३-०-१७-०