रोजगार विनिमय केंद्रात ऑनलाईन नोंदणी पोर्टलचा मुख्यमंत्र्यांहस्ते प्रारंभ

0
91

रोजगार विनिमय केंद्रात ऑनलाईन नोंदणीची सुविधा असलेल्या नॅशनल करियर सर्व्हिस पोर्टलचा काल पर्वरी येथे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

बेरोजगार युवा वर्ग तसेच नोकर्‍या देणार्‍या कंपन्या व आस्थापने अशा सर्वांनाच या पोर्टलचा फायदा होणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सागितले. कामगार आणि रोजगार मंत्री रोहन खंवटे हेही यावेळी हजर होते.
बेरोजगार युवक – युवतींना आता रोजगार विनिमय केंदांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार आहे, असे पर्रीकर म्हणाले.

रोजगारासंबंधीचे सगळे घटक ह्या पोर्टलमुळे एकत्र येण्यास मदत होणार असल्याचे सांगून क्रांतीकारी अशी ही घटना असल्याचे पर्रीकर म्हणाले. रोजगार मिळवून देण्यास मदत करणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील ोपीींशी.लेा, र्िींळज्ञीक्षेली, ीरीरश्रीेूसरी.लेा आदींशीही हे पोर्टल जोडण्यात येणार आहे.

बेरोजगारांना आपल्याला योग्यतेप्रमाणे योग्य अशा नोकरीची निवड करता येईल. ह्या पोर्टलमुळे भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येईल. एसएसएस, ईमेलद्वारे विविध खात्यांच्या कार्यक्रमांविषयीची व अन्य माहिती मिळू शकेल. भारत सरकारने तयार केलेल्या या नॅशनल करियर सर्व्हिस पोर्टलमध्ये गोवा सरकारसाठी आवश्यक त्या नव्या गोष्टींचा गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी समावेश करील. सर्व घटकांसाठी वेगळी ओळख असलेली कार्डे तयार करून ती त्यांना देण्यात येतील.