‘रेरा’ कायदा अधिसूचित

0
127

नगरविकास खात्याने ‘रेरा’ कायद्याचे अंतिम नियम अधिसूचित केले असून बिल्डर व प्रवर्तकांना नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गोवा बांधकाम नियमन आणि विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. पाटो पणजी येथे नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात रेरा खास विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने रिअल इस्टेट ऍक्ट २०१६ (रेग्युलेशन अँड डेव्हलप’ेंट) या कायद्याच्या कार्यवाहीची सूचना सर्व राज्यांना केली आहे. त्यानंतर नगरविकास खात्याने रेरा कायद्याच्या कार्यवाहीसाठी गोवा रिअल इस्टेट नियम २०१७ तयार करण्यात आला आहे. नगरविकास खात्याने ऑगस्ट २०१७ मध्ये सरकारी पत्रकात ‘रेरा’चे नियम अधिसूचित केले होते. त्यावर संबंधित व नागरिकांच्या सूचना व हरकती घेतल्यानंतर ‘रेरा’मध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे.

या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे. बिल्डरांना शिस्त लावण्याबरोबरच या व्यवसायातील मनमानी कारभाराला चाप बसण्यास मदत होणार आहे.