रेईश मागुश ग्रामसभेत वेरेत कॅसिनोला विरोध

0
128

कॅसिनो वेरेत आणण्याच्या प्रश्‍नावर रेईश मागुश पंचायतीने काल रविवारी खास ग्रामसभा बोलावली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी वेरेत कॅसिनोला तीव्र विरोध दर्शवल्याने ही ग्रामसभा बरीच वादळी ठरली. ग्रामस्थांनी सरपंचांवर विध प्रश्‍नांचा भडिमार केला. तसेच पंचायतीने जो कसिनो मालकांना जेटी बांधण्यासाठी तात्पुरता परवाना दिला आहे तो त्वरित मागे घ्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्श् करीत होते. त्यामुळे आमदार जयेश साळगावकर यांना मध्यस्थी करावी लागली.

सध्या वेरे भागात कॅसिनो हा ज्वलंत प्रश्न गाजत असताना सरपंच वीरेंद्र शिरोडकर यांनी ही ग्रामसभा त्याच प्रश्‍नावरून खास बोलावली होती. सरकारने मांडवी नदीतला कसिनो वेरेच्या बाजूने हलविला तर येथील पारंपरिक मासेमारी करणारे लोक आपल्या उपजीविकेला मुकतील. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यासाठी जेटी बांधण्यासाठी पंचायतीने दिलेली परवानगी मागे घ्यावी अशी मागणी करत पंचायतीची या संबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान पंच फेलिक्स रॉड्रिगीस यांनीही कॅसिनोला वेरेत आणण्यास तीव्र विरोध दर्शवला. पंचायत त्या कॅसिनो मालकांना नोटीस पाठवून जागेची पाहणी करणार आहे. त्यानंतर पंचायत समितीची बैठक होऊन त्यांनी जे तात्पुरते बांधकाम केले आहे ते पाडण्यास सांगणार आहे. सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करूनच हा निर्णय घेण्यात येईल. बंदर खात्याने पंचायतीला अंधारात ठेवून कॅसिनोला परवानगी दिल्याचे सरपंचांनी सांगितले.

मंत्री मायकल लोबो यांनी कॅसिनो हलविण्याचा निर्णय माझ्या मंत्रिपदाच्या काळात झाल्याचा अपप्रचार चालवला आहे. ला आहे असा खोटा अपप्रचार चालविला आहे. कॅसिनो चालकांनी दि. ४ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यांना दि. २८ नोव्हेंबर रोजी परवानगी दिली. त्याकाळात मी मंत्री नव्हतो. अशी माहिती आमदार साळगावकर यांनी दिली. दरम्यान, यावेळी बहुतेक सर्व पंचांनी कॅसिनोला विरोध दर्शवला.