रित्विज, नितीशची घोडदौड

0
84

पणजी (क्री.प्र.)
श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या रित्विज परब व नितीश बेलुरकर यांनी काल झकास कामगिरी केली. रित्विजने आंतरराष्ट्रीय मास्टर वर्धन नागपाल याला पराजित करत आपली गुणसंख्या ६.५ केली. तर नितीशने आंतरराष्ट्रीय मास्टर हिमांशू शर्माला बरोबरीत रोखले. आंतरराष्ट्रीय मास्टर कार्तिक वेंकटरमन याने युक्रेनचा ग्रँडमास्टर नेवेरोव वेलरी याला नमवून धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याचे ७.५ गुण झाले असून ग्रँडमास्टर इदानी पोया (इराण), अर्मेनियाचा ग्रँडमास्टर बाबुजियान लेवोन व बेलारुसच्या सर्जेई कास्परोव यांच्यासह तो संयुक्त प्रथम आहे. फिडे मास्टर अमेय अवदी याला विक्रमजीत सिंग याच्याकडून अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. नीरज सारिपल्लीने इंडोनेशियाच्या अरफान बागुस याला हरवून आपले ५.५ गुण केले. उमंग कैसरे व तन्वी हडकोणकर यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवून आपले गुण ४.५ केले.