राहुल गांधींचे पंतप्रधानांना महिला आरक्षणासाठी पत्र

0
107

>> संसदेत मंजुरीसाठी पाठिंब्याची ग्वाही

गेल्या आठ वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. यासाठी लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देण्याचे आश्‍वासनही राहुल गांधींनी या पत्रात दिले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्या दि. १८ जुलैपासून सुरू होणार आहे.

महिला आरक्षण विधेयकात लोकसभा तसेच राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी तथा संपुआच्या कार्यकाळात राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले होते. तथापि लोकसभेत अजूनही मंजूर होऊ शकलेले नाही. मात्र विद्यमान मोदी सरकारकडे बहुमत असल्याने ते यावेळी मंजूर होणे सहज शक्य आहे. लोकसभा व राज्यसभा मिळून महिला सदस्यांची संख्या सध्या एकूण ९६ एवढीच आहे. लोकसभेतील ५४३ पैकी फक्त ६५ महिला सदस्य असून राज्यसभेच्या २४३ पैकी ३१ महिला खासदार आहेत.देशभरातील महिला संघटनांनी येत्या संसदीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूरची मागणी केली होती.