राष्ट्रपती कोविंद यांचे शनिवारी गोव्यात आगमन

0
69

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे येत्या ७ जुलैला गोव्यात आगमन होणार असून ८ जुलैपर्यंत ते गोव्यात असतील. राष्ट्रपती कोविंद प्रथमच गोव्यात येत असल्याने त्यांचा ७ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता दोनापावल येथील एनआयओ सभागृहात नागरी सन्मान करण्यात येणार आहे. माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक टी. एस. सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली.
राष्ट्रपती कोविंद यांचे ७ रोजी सकाळी दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. या दिवशी राष्ट्रपती कोविंद दुपारी १२ वाजता गोवा विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.