राष्ट्रपतींचे नवी दिल्लीस प्रयाण

0
120

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि भारताच्या प्रथम महिला श्रीमती सविता कोविंद गोव्याच्या दोन दिवसांच्या भेटीनंतर आयएनएस हंसा दाबोळी विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, पोलीस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर आणि रीयर ऍडमिरल हेमंत पडबिद्री व शिष्टाचार सचिव डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी त्यांना निरोप दिला.

जुने गोवा चर्च, मंगेशी मंदिरास भेट
दरम्यान, नवी दिल्लीस रवाना होण्यापूर्वी राष्ट्रपती श्री. कोविंद आणि श्रीमती सविता कोविंद यांनी जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बोम जिझस चर्च आणि मंगेशी येथील मंगेश मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल डॉ. सिन्हा होत्या. दोन्ही ठिकाणी राष्ट्रपतीना स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.