राष्ट्रकुल ः राणी रामपालकडे नेतृत्व

0
91

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघाचे नेतृत्व आघाडीपटू राणी रामपाल हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. भारताचा या ‘अ’ गटात समावेश करण्यात आला असून मलेशिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेल्स हे या गटातील इतर देश आहेत. अनुभवी गोलरक्षक सविता पूनिया हिला उपकर्णधार नेमण्यात आले आहे. २००२ साली भारताने यजमान इंग्लंडचा अतिरिक्त वेळेत ३-२ असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. यानंतर २००६ साली भारताला यजमान ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. मागील दोन सत्रात मात्र भारताची कामगिरी अपेक्षेनुरुप झालेली नाही. २०१० व २०१४ साली भारताला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आपली कामगिरी सुधारण्याची संधी भारताकडे चालून आली आहे.

भारतीय संघ ः गोलरक्षक ः सविता पूनिया, रजनी इटिमारपू, बचावपटू ः दीपिका, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, सुशीला चानू पुखरामबाम, मध्यरक्षक ः मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिन्झ, आघाडीपटू ः राणी रामपाल, वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवज्योत कौर, नवनीत कौर व पूनम राणी.