राणे पिता-पुत्रास अटकपूर्व जामीन

0
103

खाण पर्यावरण परवान्यासाठी सहा कोटींची खंडणी मागितल्याचा कथित आरोप असलेले विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे व आमदार विश्‍वजित राणे यांना काल सीबीआय कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. १ लाख रु. हमी तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाऊ नये या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला.
राणे-पिता पुत्रांविरोधात राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) भ्रष्टाचार, खंडणी व कटकारस्थान या आरोपाखाली गुन्हा दाखल केल्यानंतर अटक टाळण्यासाठी ५ जुलै रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने राणे पिता-पुत्राला अटक करू नये तसेच त्यांनी गोवा सोडून जाऊ नये असे आपल्या अंतरिम आदेशात म्हटले होते.
८ जुलै रोजी रोजी एसआयटीचे वकील प्रसाद कीर्तनी यांनी वेळ मागितला होता. त्यानंतर २१ रोजी दुपारी २.३० वा. सुनावणी झाली त्यावेळी राणे यांचे वकील शिरीश गुप्ते यांनी अतिरिक्त कागदपत्रे न्यायालयात सादर केले होते त्यामुळे याप्रकरणी युक्तीवाद झाला नव्हता. कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी एसआयटीचे वकील प्रसाद कीर्तनी यांनी वेळ मागितल्यावर सुनावणी २५ जुलै रोजीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर २५ रोजी युक्तीवाद होऊ न शकल्याने शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी ठेवला होता. त्यावेळी आमदार विश्‍वजीत राणे उपस्थित होते. नंतर त्यावर काल युक्तीवाद झाला.