राज्य सह. बँक अध्यक्षावरील अविश्‍वासावर उद्या चर्चा

0
76

कोर्टाने दिला होता आदेश
गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्यावरील अविश्वासाच्या ठरावावर उद्या मंगळवार दि. २८ रोजी चर्चा घेण्याचे निश्‍चित झाले आहे.
बँकेच्या संचालक मंडळावरील १६ सदस्यांपैकी ९ सदस्यांनी फळदेसाई यांच्या विरुध्द अविश्‍वासाचा ठराव आणला होता. मनमानी कारभाराचा त्यांच्यावर आरोप आहे. ठरावावरील चर्चा निश्‍चित न करण्याच्या कारणामुळे संबंधितांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दि. ३१पूर्वी ठराव चर्चेस घेण्याचा आदेश दिला होता.
फळदेसाई यांच्या गटाने काही संचालक मंडळातील सदस्यांची मने वणविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
उद्या फळदेसाई यांच्या अध्यक्षपदाचे भवितव्य ठरेल.