राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महाभाई भत्त्यात वाढ

0
100

राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि अनुदानित शिक्षण संस्थांतील कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्यात १ टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता ४ टक्क्‌यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या पगारातून हा महागाई भत्ता दिला जाणार आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. तीन महिन्यांची थकबाकी देण्यात येणार आहे.