राज्य विधानसभेचे आज विशेष अधिवेशन

0
67

राज्य विधानसभेचे एक दिवशीय अधिवेशन आज सकाळी ११.३० वाजता बोलावण्यात आले असून १२१ वी घटना दुरुस्ती आणि न्यायिक नियुक्त्या आयोगावर अधिवेशनात शिक्कामोर्तब केले जाईल. वरील विधेयक लोकसभा व राज्यसभेत यापूर्वीच संमत झाले होते. न्यायिक नियुक्त्या आयोग विधेयकाला ५० टक्क्यांहून अधिक राज्य विधानसभांची मान्यता मिळणे आवश्यक आहे. गोवा व देशातील अन्य राज्यांच्या विधानसभांमध्ये वरील सोपस्कार करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यासाठी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे.