राज्याला चक्रीवादळाचा तडाखा

0
140

>> ठिकठिकाणी मुसळधार पाऊस

पूर्व मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळामुळे गोव्यातील विविध भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून २७० ते २८० किमी उत्तरेच्या दिशेने सरकत असून ३ जूनला अलिबाग – रायगड भागात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने काल दिली.
राजधानी पणजी शहरामध्ये सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या ९ तासात ४०.७ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

अरबी समुद्रातील या चक्रीवादळाची गोव्याला झळ बसू लागली आहे. ताशी ४५ ते ५५ किलो मीटर वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे झाडांची पडझड व विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. ३ जूनपर्यंत गोव्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वार्‍यामुळे हानी होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली. पणजीतील प्रमुख रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहन चालक, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.