राज्यात दिवसभरात सर्वाधिक ३४८ कोरोनारुग्ण

0
140

>> २४ तासांत तिघांचा मृत्यू

>> सध्याची रुग्णसंख्या २०७२

राज्यात काल नवे ३४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून आत्तापर्यंतची ही उच्चांकी संख्या आहे. दरम्यान, काल आणखीन ३ रुग्णांचे निधन काल झाले असून कोरोना बळींची संख्या ६४ झाली आहे. यापूर्वी २ ऑगस्टला ३३७ रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७४२३ एवढी असून सध्याच्या रुग्णांची संख्या २०७२ एवढी आहे.

काल १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५२८७ वर पोचली आहे. गोमेकॉच्या कोरोना खास वॉर्डात ७२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. राज्यात सलग आठव्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या निधनाचे सत्र सुरूच आहे. खांडोळा माशेल येथील ७१ वर्षीय महिला रुग्णांचे कोविड हॉस्पितळात काल निधन झाले.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेल्या कुडणे, डिचोली येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण आणि तोर्डा, पर्वरी येथील ७९ वर्षीय वृद्धेचे निधन झाले आहे. जीएमसीच्या प्रयोगशाळेत ७५० स्वॅबचे नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेतून १८११ स्वॅब चाचण्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यातील ३४८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य खात्याने १९९१ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.