राज्यात कोरोनाचे नवे ५२ रुग्ण

0
165

राज्यात कोरोना विषाणूने आठवा बळी घेतला आहे. माजी आरोग्यमंत्री, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश आमोणकर यांचे कोविड हॉस्पिटलमध्ये काल निधन झाले. दरम्यान, राज्यात नवीन ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४५ झाली आहे. खोली – म्हापसा येथे एक आयसोेलेटेड रुग्ण आढळला आहे. धारबांदोडा, मडगाव, फोंडा, वेर्णा, वाळपई, मंडूर, साखळी, उसगाव, पर्वरी या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १८१३ वर पोहोचली आहे. कोरोना पॉझिटिव्ह १२५ रुग्ण सोमवारी बरे झाले असून आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०६१ एवढी झाली आहे.

खोर्ली म्हापसा येथे नवीन रुग्ण
खोर्ली म्हापसा येथे आयसोलेटेड १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. गंगानगर, म्हापसा येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ झाली आहे.

मडगाव, साखळीत ४ रुग्ण
मडगाव येथे नवीन ४ रुग्ण आढळून आले आहेत. मडगावातील रुग्णांची संख्या २२ झाली आहे, साखळी येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. डिचोलीतील रुग्णांची संख्या ९ झाली आहे. तसेच चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

वाळपई, उसगावात २ रुग्ण
वाळपई येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या १० झाली आहे. उसगाव येथे १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची एकूण संख्या ६ झाली आहे.

पर्वरी, मंडूर, वेर्णा येथे रुग्ण
पर्वरी येथे रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ४ झाली आहे. मंडूर येथे आणखी २ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ४ झाली आहे. वेर्णा येथे २ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ९ झाली आहे.

सडा, न्यूववाडे येथे ३ रुग्ण
सडा येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ७० झाली आहे. न्यूववाडे येथे आणखी १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ६० झाली आहे.

धारबांदोडा, फोंड्यात नवीन रुग्ण
धारबांदोडा येथे नवीन ९ रुग्ण आढळून आले असून या भागातील रुग्णांची संख्या १० झाली आहे. फोंड्यात नवीन ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २३ झाली आहे.