राज्यात कोरोनाचे नवे १०० रुग्ण

0
132

राज्यात काल नवीन १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ८९५ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह ७४ रुग्ण बरे झाले आहेत. बेतकी येथे नवीन २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोलवा, करासवाडा येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

बेतकी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. वळवई येथील एकाच कुटुंबातील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. या कुटुंबातील एक सदस्य वेर्णा येथील औषध निर्मिती कंपनीमध्ये काम करीत आहे.

बाणावली येथे २ रुग्ण आढळून आले आहेत. कोलवा आणि करासवाडा येथे प्रत्येकी १ आयसोेलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मडगाव येथे नवीन ५ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या १२ झाली आहे. फातोर्डा येथे नवीन २ रुग्ण आढळले आहेत.

फोंडा, शिरोड्यात नवीन रुग्ण
फोंडा येथे नवीन ३ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. शिरोडा येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या १४ झाली आहे.

पेडणे, नेरूल येथे रुग्ण
पेडणे येथे ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १२ झाली आहे. नेरूल येथे ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ७ झाली आहे.
वास्कोत रुग्णांच्या संख्येत वाढ
वास्को भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. खारीवाडा येथे नवीन ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. न्यूववाडे येथे नवीन ५ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ७८ झाली आहे. सडा येथे आणखी ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ८८ झाली आहे. बायणा येथे आणखी ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ९१ झाली आहे. जुवारीनगर येथे नवीन ७ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ११८ झाली आहे.

मुरगावातील प्रभाग १५ कंटेनमेंट झोन

मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत वास्को खारीवाडा, मुरगाव पालिकेचा प्रभाग १५ कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या परिसरात अनेक कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने शासनाला निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.