राज्यातील महाविद्यालये १ सप्टेंबरपासून सुरू

0
211

गोवा विद्यापीठाने २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयीन वर्ग येत्या १ सप्टेंबर २०२० पासून सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे.

यासंबंधीचे एक परिपत्रक गोवा विद्यापीठाचे निबंधक प्रा. वाय. एस. रेड्डी यांनी जारी केले आहे. गोवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य, डीन यांनी महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती सर्वांनी द्यावी, अशी सूचना परिपत्रकात करण्यात आली आहे.
गोवा विद्यापीठाने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील तृतीय वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत. गोवा विद्यापीठाशी संलग्न राज्यातील महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑगस्टच्या अखेरपर्यत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.