राज्यातील ड्रग्स व्यवहाराला मिळतोय राजाश्रय ः सोपटे

0
109

>> राजकारण्यांना माफियांकडून हप्ते

राज्यात फोफावलेल्या अमली पदार्थ व्यवहाराला राजाश्रय असून त्याशिवाय हा व्यवहार राज्यात चालू राहू शकत नाही, असा दावा आमदार दयानंद सोपटे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. ड्रग्स माफियांकडून राजकारण्यांना हप्ते मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

इच्छाशक्ती असल्यास राज्यातील नेते हा व्यवहार बंद करू शकतात, असे सोपटे म्हणाले. सरकारने राज्यभर फोफावत चाललेला हा अमली पदार्थांचा व्यवहार बंद पाडण्याची वेळ जवळ येऊन ठेपली असून गृह खात्याने अमली पदार्थ विरोधी पोलीस दलाची ताकद वाढवण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यास
काम कठीण नाही
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी जर ठरवले तर या अमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडणे हे कठीम काम नसल्याचे सोपटे म्हणाले. पूर्वी अमली पदार्थ फक्त किनारपट्टी भाग व शहरांपुरते मर्यादित होते. आता ते गावा-गावातही पोचले असल्याचे सोपटे म्हणाले.

राजकारण्यांना हप्ते
अमली पदार्थ माफियांकडून राजकीय नेत्यांना वेळोवेळी हप्ते मिळत असल्यानेच या माफियांविरुद्ध कारवाई होत नसल्याचे सोपटे यांनी स्पष्ट केले. ड्रग्ज प्रकरणी आपण गोव्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कारवाई करण्याची त्यांच्याकडे मागणी केली आहे, असे उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय भिके यांनी सांगितले.
कळंगुट व बागा या किनार्‍यांवर अमली पदार्थांचा महापूर आला असल्याचे ते म्हणाले.