राज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे

0
149

 

राज्यात कोरोना विषाणूबाधित १ नवीन रुग्ण काल आढळून आला. तर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण बरा झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३१ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत कोरोना बाधा झालेले ३८ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने काल दिली.

महाराष्ट्रातून रस्ता मार्गाने आलेल्या एका प्रवाशाची कोविड चाचणी पॉझिटीव आली आहे. त्याला उपचारार्थ मडगाव येथील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास वॉर्डात संशयित २ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या कोरोनाच्या ८८६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे. तर एका नमुन्यांचा अहवाल पॉझिटीव आला आहे. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेतील ९६ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

केंद्र सरकारने रेल्वेगाड्या सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६९ एवढी झाली आहे. त्यातील ३८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य खात्याने ४१६ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारंटाईऩ केले आहे. तसेच, आंतरराज्य प्रवास केलेल्या २६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. २१ जणांना सरकारी क्वारंटाईन सुविधेखाली आणण्यात आले असून सरकारी क्वारंटाईनखाली २१८ जणांना ठेवण्यात आले आहेत.