राज्यातील केवळ १९० विद्यालयांत सुरक्षा रक्षक

0
124

राज्यातील १९० विद्यालयांना शिक्षण खात्याने सुरक्षा रक्षक पुरवले असल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल दिली. ज्या विद्यालयांमध्ये २५० व त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत अशा विद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरवण्याची सरकारची योजना आहे. या योजनेखाली शिक्षण खात्याने १९० विद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरवले असल्याची माहिती भट यांनी दिली. २५० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या विद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरवण्याची सरकारची योजना नाही. त्यामुळे कमी विद्यार्थी असलेल्या विद्यालयांना सुरक्षा रक्षक देता येत नसल्याचे भट यांनी यावेळी सांगितले.
बालरथांच्या चालकांना पगारवाढ
विद्यार्थ्यांची विद्यालयांतून ने-आण करणार्‍या बालरथांच्या ५०० ड्रायव्हर्सना व ५०० ऍटेंन्डटस्‌च्या पगारात प्रत्येकी १० टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. ड्रायव्हरांचा पगार १० हजारांवरून ११ हजार तर ऍटेन्डंटस्‌चा पगार ५ हजारांवरून ५५०० हजार रु. असा वाढवण्यात आला असल्याचे भट यांनी सांगितले.