राज्यातील अप्रशिक्षित शिक्षकांना बीएड, डीएड अभ्यासक्रमांसाठी मुदत

0
125

सध्या अनुदानित तसेच विना अनुदानित विद्यालयांमध्ये सेवेत असलेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना मार्च २०१९ पर्यंत शिक्षक प्रशिक्षण (बीएड, अथवा डीएड) पूर्ण करावे लागेल. अन्यथा त्यांना नोकरीला मुकावे लागेल, असे शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल सांगितले.
सदर शिक्षकांना ऑनलाईन बीएड करण्यासाठीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे भट यांनी सांगितले. ऑनलाईन लेक्चर ऐकून या शिक्षकांना बीएड, डीएड अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. त्यांना शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करता यावे व त्यांच्यावर नोकरी गमावण्याची पाळी येऊ नये यासाठी केंद्र सरकारनेच ही ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय उपलब्ध करून दिली असल्याचे भट यांनी सांगितले.
राज्यभरातील विनाअनुदानित विद्यालयात ४२६ तर अनुदानित विद्यालयांमध्ये २८ अप्रशिक्षित शिक्षक आहेत. त्याशिवाय प्रशिक्षण नसल्याने नोकरी गमवावी लागलेले १३२ पॅरा शिक्षकही आहेत.