राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रांची संख्या ८८

0
175

राज्यभरात सुमारे ८८ अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. या अपघात प्रवण क्षेत्रांची सुधारणा करण्यासाठी उपाय योजना केली जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.

ताळगावच्या आमदार जेनिफोर मोन्सेरात यांनी राज्यातील अपघातप्रवण क्षेत्राबाबत प्रश्‍न विचारला होता. कांपाल पणजी येथे बांदोडकर रस्त्यावर बालभवन जवळील बालगणेश मंदिराजवळ अपघातप्रवण क्षेत्र आहे. या ठिकाणी वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवून अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात आली आहे. पाटो ते रायबंदर रस्ता अपघातप्रवण क्षेत्रात येत आहे. याठिकाणी वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. तसेच गतिरोधक उभारण्यात आले आहेत. या रस्त्यावर सतत मध्य रेष आखण्यात आली आहे, अशी माहिती उत्तरात दिली. मेरशी सर्कल, गोमेकॉ बांबोळी येथेही मुख्य रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्रे आहेत.