राज्याच्या नोकरशाहीत फेरबदल

0
131

नवीन आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती; मामलेदार, संयुक्त मामलेदार, कनिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या
राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवरील अधिकार्‍यांच्या बदल्या घडवून आणताना काल सरकारने बदली झालेले उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती नीला मोहनन् (आयएएन) यांची नियुक्ती केली. तर पर्यटन खात्याचे संचालक म्हणून निखिल देसाई यांच्याकडे असलेला अतिरिक्त ताबा काढून घेताना त्या जागी अमेय अभ्यंकर (आयएएस) यांची नियुक्ती केली. तुरुंग महानिरीक्षक पदावरील एफ. ओ. हाश्मी (आयएएस) यांना या जबाबदारीतून मुक्त करताना त्या जागी सचिन शिंदे (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली.
नीला मोहन यांच्याकडे भू नोंदणी व तंटा निवाडा हा अतिरिक्त ताबा असेल. तर अमेय अभ्यंकर यांच्याकडे विशेष सचिव (आर्थिक अर्थसंकल्प) तसेच संचालक (पीपीपी कक्ष) हा ताबा राहील. ते पद सांभाळणार्‍या आनंद शेरखाने यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
सचिवांना खात्यांचे वितरण
दरम्यान, काल सरकारने एका अधिसूचनेद्वारे विविध सचिवांनाही खाती वाटून दिली.
मुख्य सचिव बी. विजयन् (आयएएन) यांना गृह, कार्मिक, एआरडी, दक्षता, मुख्य दक्षता अधिकारी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य प्रशासन या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
विशेष सचिव (वन) आर. के. श्रीवास्तव (आयएएस) यांच्यावर वन, पर्यावरण, नगरविकास, महसूल, पर्यटन, अनिवासी भारतीय व्यवहार, माहिती तंत्रज्ञान, गृहबांधणी, कायदा, न्यायपालिका व विधिमंडळ व्यवहार या खात्यांची सार्वजनिक बांधकाम खात्याचे विशेष सचिव परिमल राय (आयएएस) यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते, नगर आणि नियोजन, उद्योग, व्यापार व वाणिज्य, हस्तकला, कापड आणि काथा व वाहतूक या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आयुक्त आणि सचिव (वीज) प्रशांत गोयल (आयएएस) यांच्याकडे वीज, अपारंपरिक ऊर्जा, कामगार व रोजगार ही खाती, डॉ. शरत् चौहान (आयएएस) यांच्याकडे आरोग्य, बंदरे, नदी परिवहन, कारखाने आणि बाष्पक, समाज कल्याण, हस्त कारागिर ही खाती, केशवचंद्र (आयएएस) यांच्याकडे निवडणूक व मुख्य निवडणूक अधिकारी ही खाती दिली आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आयुक्त व सचिव पी. कृष्णमूर्ती (आयएएस) यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचे सचिव, वित्त, नियोजन, महिला आणि बालविकास ही खाती, क्रीडा सचिव पी. मॅथ्यू सॅम्युएल (आयएएस) यांच्याकडे क्रीडा व युवा व्यवहार, पंचायती राज, ग्रामीण विकास, सार्वजनिक तक्रारी राजभाषा, संचालक जीआयपीएआरडी, गोवा लोकायुक्त ही खाती.
सहकार सचिव एफ. ओ. हश्मी यांच्याकडे सहकार, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार, कला व संस्कृती, जलसंसाधन ही खाती. शिक्षण संचालक डी. पी. द्विवेदी (आयएएस) यांच्याकडे शिक्षण (शालेय/उच्च व/तांत्रिक) कृषी, पुराभिलेख, वास्तूसंग्रहालय व गॅझेटियर ही खाती.
आदिवासी कल्याण सचिव तालेम तापोक यांच्याकडे आदिवासी कल्याण, गोवा राज्य अनुसूचित जमाती आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद ही खाती.
मुद्रण आणि छापखाना सचिव झेड. यू. सिद्दिकी (आयएएस) यांना मुद्रण आणि छापखाना, मुद्रण आणि छापखाना संचालक, गोवा मानवी हक्क आयोग सचिव, गोवा राज्य मागास वर्ग आयोग सचिवपद ही पदे.
नागरी उड्डाण सचिव पवन के. सैन यांना नागरी उड्डाण, प्रोव्हेदोरिया, खाण, माहिती आणि प्रसिद्धी ही खाती. मच्छीमारी सचिव आमजर टाक (आयएएस) यांना मच्छीमारी, पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा सेवा वजन आणि माप, शिष्टाचार ही खाती.
राज्यपालांच्या सचिव शिल्पा शिंदे (आयएएस) यांना राज्यपालांच्या सचिव, गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ही खाती ही सोपवण्यात आली आहेत.
कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या बदल्या
सरकारने एका आदेशाद्वारे काही कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. उत्तर गोवा कोमुनिदादचे प्रशासक असा अतिरिक्त ताबा असलेले सहाय्यक वाणिज्य कर आयुक्त विशांत नाईक गावणेकर यांना सहाय्यक वाणिज्य कर आयुक्तपदी ठेवतानाच त्यांच्याकडे दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपण्यात आली आहे.
दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक म्हणून त्यांना मंगळवारी व गुरुवारी काम पहावे लागेल. तर सोमवार, बुधवार व शुक्रवारी त्यांना वाणिज्य कर खात्यात काम करावे लागेल.
नियुक्तीची वाट पाहणार्‍या प्रदीप नाईक यांच्यावर मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळाचे प्रशासकीय अधिकारी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या पदावरील पंढरीनाथ नाईक यांची बदली करण्यात आली आहे.
अवर सचिव, जीए-२ रमाकांत तळकर यांची बदली वीज खात्याचे उपसंचालक (प्रशासन) म्हणून करण्यात आली असून त्या पदावरील एस. पी. सिग्नापूर यांची बदली करण्यात आली आहे.
नियुक्तीची वाट पाहत असलेल्या चंद्रकांत शेटकर यांची पंचायत उपसंचालक (दक्षिण) अशी बदली करण्यात आली आहे. त्या पदावरील अनुजा नाईक गावकर या बालसंगोपन रजेवर आहेत. कुंकळ्ळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माया पेडणेकर यांच्याकडे कोमुनिदादीच्या केंद्रीय विभागाच्या प्रशासकीयपदाचा पदभार होता. त्यांच्याकडे आता कोमुनिदादीच्या केंद्रीय विभागाच्या ताब्याबरोबरच उपजिल्हाधिकारी (एलए), उत्तर व कोमुनिदाद आयोगाच्या सचिव ही जबाबदारी देण्यात आली आहे.
मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळाचे प्रशासकीय अधिकारीपदी असलेल्या पंढरीनाथ नाईक यांच्याकडे पंचायत उपसंचालक (दक्षिण) हा अतिरिक्त ताबा होता. त्यांची बदली कुंकळ्ळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
पेडण्याचे उपजिल्हाधिकारी, एसडीएम – नारायण गाड यांच्याकडे कोमुनिदाद प्रशासक (उत्तर) ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पदभाराची वाट पाहत असलेल्या प्रशांत शिरोडकर यांना अवर सचिव, जीए-२ म्हणून पदभार देण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ अरविंद बुगडे यांची बदली माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक म्हणून करण्यात आली असून त्या पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणार्‍या संदीप जॅकीस यांना पदमुक्त करण्यात आले आहे.
दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ दामोदर मोरजकर यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ दक्षिण हा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
मामलेदार, संयुक्त मामलेदारांच्या बदल्या
दरम्यान, एका आदेशाद्वारे काल खालील संयुक्त मामलेदार व मामलेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. सपना नाईक संयुक्त मामलेदार-४ सासष्टी यांची बदली मामलेदार-१ तिसवाडी म्हणून करण्यात आली आहे.
ईशा सावंत संयुक्त मामलेदार-१ तिसवाडी यांची बदली संयुक्त मामलेदार-२ पेडणे म्हणून करण्यात आली आहे. मंदार नाईक संयुक्त मामलेदार-२ पेडणे यांची बदली संयुक्त मामलेदार-४ सासष्टी म्हणून करण्यात आली आहे. पेडण्याचे मामलेदार अनिल राणे सरदेसाई यांची बदली संयुक्त मामलेदार-३ डिचोली येथे करण्यात आली आहे. आमालिया पिंटो संयुक्त मामलेदार-३ डिचोली यांची बदली संयुक्त मामलेदार-१ पेडणे म्हणून करण्यात आली आहे. संयुक्त मामलेदार-१ पेडणे राजेश आजगावकर यांची बदली पेडणे मामलेदार म्हणून करण्यात आली असून त्यांना पेडणे नगरपालिकेचे मुख्याधिकारी हा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.