राजीव यदुवंशी यांची सहा तास कसून चौकशी

0
78

>> खाण घोटाळा प्रकरण

खाण घोटाळ्याची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाने खाण खात्याचे माजी प्रधान सचिव राजीव यदुवंशी यांची काल बुधवारी सहा तास कसून चौकशी केली. दरम्यान, यदुवंशी यांना आजही चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

खाण घोटाळ्याच्या सोळा प्रकरणांमध्ये यदुवंशी यांची सखोल चौकशी केली जात आहे. खाण खात्याच्या सचिवांनी नोंदविलेल्या निरीक्षणांना बगल देत यदुवंशी यांनी मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याचा कयास पोलीस सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांच्या दबावामुळे यदुवंशी यांनी खाण सचिवांनी नोंदविलेल्या निरीक्षणांना बगल दिल्याचा कयास एसआयटीकडून व्यक्त केला जात आहे.
या खाण घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. तसेच खाण मालक प्रफुल्ल हेदे यांचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, खाण खात्याचे माजी संचालक जे. बी. भिंगी यांची एसआयटीने चौकशी केली आहे.