राजस्थान- बंगलोर सामना रद्द

0
66

इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मुसळधार पावसामुळे ८ वाजता सुरु होणारा सामना ११ वाजून २६ मिनिटांनी सुरु झाला. षटकांची संख्या कमी करून प्रत्येकी पाच करण्यात आली. बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५ षटकांत ७ बाद ६२ धावा केल्या. विराट व एबी डीव्हिलियर्स यांनी केवळ १० चेंडूंत ३५ धावांची सलामी दिल्यानंतर श्रेयस गोपाळच्या हॅट्‌ट्रिकमुळे बंगलोरच्या डावाला उतरती कळा लागला. गोपाळने विराट, एबी व स्टोईनिस यांना सलग चेंडूंवर बाद केले. याव्यतिरिक्त ओशेन थॉमसने २ तर रियान पराग व उनाडकट यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी राजस्थानला ४१ धावांची सलामी दिली. सॅमसनने केवळ १३ चेंडूंत २८ धावा केल्या. युजवेंद्र चहलने सॅमसनला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. अनिर्णित म्हणून या सामन्याची नोंद करण्यात आली असून उभय संघांना प्रत्येकी १ गुण बहाल करण्यात आला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळ उभय संघांच्या ‘प्ले ऑफ’ प्रवेशाच्या उरल्यासुरल्या आशा देखील संपुष्ष्टशाश्रत आल्या आहेत.