राजस्थानात गेहलोत यांची अधिवेशनाची नव्याने मागणी

0
120

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारने राज्यपाल कालराज मिश्रा यांना विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा नवा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावात ३१ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावात कोरोनाच्या स्थितीबद्दल चर्चा करण्याविषयी उल्लेख असून त्यात विश्वासदर्शक ठरावाचा उल्लेख नाही.

कोरोनासह काही विधेयकावरील चर्चेचा या प्रस्तावात देखील उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्यपालांना रविवारी पाठविण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैपासून बोलविण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी ठरावामध्ये म्हटले आहे. यापूर्वी कॉंग्रेसच्या आमदारांनीही विधानसभा अधिवेशनाच्या मागणीसाठी निदर्शने करत शुक्रवारी राजभवनवर आंदोलन केले.