राजस्थानमध्ये राज्यपालांचा अधिवेशन बोलावण्याचा निर्णय

0
111

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी काल अखेर अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. विधानसभा अधिवेशन बोलावले जाऊ नये, अशी आपली भूमिका कधीच नव्हती, असेही त्यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजस्थानात बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी कॉंग्रेसविरोधात उच्च न्यायालयात हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळली गेली आहे. तर दुसरीकडे, राजस्थान उच्च न्यायालयात राज्यपाल मिश्र यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, सचिन पायलट यांच्या गटातील ३ आमदार पुन्हा गहलोत यांच्याकडे येणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

राजस्थानचे राज्यपाल मिश्र यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी एक याचिका राजस्थान न्यायालयात दाखल करणय्ता आली असून राज्यपाल प्रामाणिकपणे आपल्या पदावरून कर्तव्य निभावत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांच्यासोबत गेलेल्या १९ आमदारांपैकी ३ आमदार पुढील ४८ तासांमध्ये गहलोत यांच्यासोबत येतील असा दावा सुरजेवाला यांनी केला आहे.