राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर रॉयल विजय

0
44

राजस्थान रॉयल्सने काल रविवारी रात्री झालेल्या आयपीएलच्या ११व्या पर्वातील २१व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर ३ गडी राखून विजय मिळविला. सूर्यकुमार यादव (७२) व ईशान किशन (५८) यांच्या बळावर मुंबईने २० षटकांत ७ बाद १६७ धावा जमवल्या. धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १४व्या षटकापर्यंत २ बाद ११० अशा सुस्थितीत होता. यानंतर बेन स्टोक्स (४०), संजू सॅमसन (५२), जोस बटलर (६), हेन्रिक क्लासेन (०) हे बाद झाल्यामुळे राजस्थानचा संघ १७.१ षटकांत ६ बाद १२५ असा चाचपडत होता. १७ चेंडूंत विजयासाठी ४३ धावांची आवश्यकता असताना कृष्णप्पा गौतमने यानंतर तुफानी फटकेबाजी करत ११ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३३ धावांची खेळी करत राजस्थानला विजयी केले. मुंबईकडून हार्दिक व बुमराह यांनी प्रत्येकी दोन तर मॅकलेनाघन, कृणाल व मुस्तफ्झुर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आज दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात फिरोजशहा कोटला मैदानावर सामना होणार आहे.