विक्रमादित्य मास्टर ब्लास्टरला विश्वास विश्वचषक भारतातच येणार

0
98

 

इंग्लंडच्या यजमानपदाखाली ३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेटचा ‘महाकुंभ’ मानल्या जाणार्‍या विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद भारतीय संघच मिळवेल असा विश्वास विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केला. बांद्रा येथीला एमआयजी क्लबच्या सचिनचे नाव देण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यात तो बोलत होता.
यंदाचा विश्वचषक भारतातच येईल असा विश्वास सचिनने व्यक्त केला आहे. सचिन २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा एक भाग होता.

आत्मविश्वास असल्यास कोणत्याही फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी होते. बॉलचा मारा, जेव्हा तो बॅटवर धडकतो आणि तेव्हा जेव्हा आवाज निर्माण होतो तो माझ्यासाठी आत्मविश्वास असतो. त्यामुळे, हा आवाज भरपूर आत्मविश्वास देता आणि आपण जर तुम्हाला कोणत्याही स्वरूपात आत्मविश्वास असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल, असे तेंंडुलकरने सांगितले.

इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये जुळवून घेण्यासाठी अजून बराच वेळ असेल. मला माहीत आहे ते समजण्यासाठी खेळाडूंनी येथे बरेच क्रिकेट खेळलेले आहे, असे विक्रमादित्य म्हणाला. भारतीय संघाला तेथे जुळवून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. त्यासाठी ते कसोटी क्रिकेट ते वनडे आणि वनडे ते टी-२० असे जुळवून घेत टेस्ट क्रिकेटकडे परत जाण्याचा प्रयत्न करतात. यंदाचा विश्वचषक हा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे, परंतु मला विश्वास आहे की तो भारतात येईल, असे सनिच म्हणला.

इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत उन्हाळी हवामान असणार असून त्याचा फलंदाजांचा तणाव कमी होण्यास मदत होईल.
जेव्हा आम्ही चॅम्पियन्स चषकात (२०१७) खेळलो होता, तेव्हा खेळपट्टी शानदार होती. जेव्हा सूर्य उगवतो आणि गरमी असते तेव्हा तेथील खेळपट्ट्या सपाट असतात. त्यामुळे मला विश्वास आहे की, फलंदाजांसाठी एक चांगला ट्रॅक असेल. जर तेथे मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण नसेल तर निश्‍चितच तेथील वातावरणात मोठा फरक नसेल हे माझे वैयक्तिक मत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय भारतीय ५ जून रोजी आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघाला यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.