रस्त्यासाठी लागणारे डांबर विदेशातून आणण्याचा प्रस्ताव ः पाऊसकर

0
177

राज्यातील रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक डांबर विदेशातून आयात करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. डांबर आयातीचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिली.

राज्यातील रस्त्यासाठी दरवर्षी साधारण ५० हजार मेट्रिक टन डांबराची आवश्यकता आहे. इराण किंवा इराक या देशातून डांबराची आयात शक्य आहे. एका ठेकेदाराने विदेशातून डांबर आयातीचा प्रस्ताव सादर केला आहे. सदर ठेकेदाराकडून राज्यातील रस्ता कंत्राटदारांना २०० लीटर ड्रममधून डांबर उपलब्ध करून दिले जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

सध्या रस्ते बांधकामासाठी उपलब्ध असलेल्या डांबराचा दर्जा योग्य नसल्याने रस्ते पावसाळ्यात खराब होतात. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामासाठी विदेशातून डांबर आयात करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.
येत्या वर्ष २०२१ पर्यत सर्व तालुक्यांना पर्यायी पाण्याचा पुरवठा करणारी व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. फोंडा तालुक्यातील केरये खांडेपार येथे मुख्य पाण्याच्या दोन जलवाहिन्या फुटल्याने राजधानी पणजीसह अनेक गावांना आठ दिवस पाण्याचा पुरवठा होऊ शकला नव्हता. असा प्रकार यापुढे घडू नये म्हणून प्रत्येक तालुक्याला पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करण्याची सूचना अधिकार्‍यांना करण्यात आली आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.