रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास राज्य सरकारचे प्राधान्य

0
92

राज्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधी कृती योजना तयार करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेतली.
राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्य क्रमाने हाती घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आपापल्या भागांत जाऊन तेथील रस्त्यांची पाहणी करुन दर आठवड्याला रस्त्यांवरील खड्डे, कोसळलेली झाडे तसेच धोकादायक स्थितीत असलेली झाडे यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला.
जिल्हाधिकार्‍यांशी चर्चेनेच खोदाई
जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा केल्याशिवाय कोणत्याही रस्त्यावर खोदकाम करण्याचे काम हाती घेऊ नये, अशी सूचनाही यावेळी पर्रीकर यांनी अभियंत्यांना केली. जिल्हाधिकार्‍यांकडून खोदकाम करण्यासाठीचा ना हरकत दाखला मिळाल्या नंतरच खोदकाम करण्याचे काम हाती घ्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.