रशियाशी गोव्याचा व्यापार करार

0
119

रशियाच्या दौर्‍यावर गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सोमवारी रशियाबरोबर व्यापारासंबंधीच्या समझोता करारावर सह्या केल्या, असे सूत्रांनी सांगितले. रशियातील खाण व मच्छीमारी या क्षेत्रातील व्यापार्‍यांबरोबर काल त्यांनी चर्चा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गोव्यात येणार्‍या रशियन पर्यटकांच्या संख्येत का घट झाली आहे ते जाणून घेण्यासाठीही तेथील पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींशी सावंत हे चर्चा करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी रशियाच्या दौर्‍यावर गेलेल्या केंद्र सरकारच्या उच्च स्तरीय शिष्टमंडळात केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांचाही समावेश आहे.

हे शिष्टमंडळ रशियाच्या दौर्‍यावर तेथील खाण, पर्यटन कृषी आदी क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. तसेच ह्या क्षेत्रात रशियन गुंतवणूक करण्याबरोबरच असतात रशियन गुंतवणूक आणण्याबाबत परस्पर चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळाचे उद्या १४ रोजी भारतात आगमन होणार आहे.