रमाकांत बोरकरना जामीन

0
137

सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांची काल न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. ७५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर शनिवारी १९ जुलै रोजी दुपारी म्हापसा येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या न्यायालयात न्या. पी. व्ही. सावईकर यांच्यासमोर हजर केले त्यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र काल पुन्हा न्यायालयासमोर उभे केले त्यांची १ लाख रुपयांच्या जामिनावर आणि तेवढ्याच हमीवर तसेच इतर काही अटी घालून जामीन देण्यात आला. त्यांना दोन आठवडे सकाळी १० ते १ व दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत दररोज लाचलुचपत प्रतिबंध विभागात हजेरी लावावी, गावात आणि पंचायत क्षेत्रात फिरू नये, गोव्याबाहेर जाऊ नये, जामिनदाराशी संपर्कात राहू नये अशा अटी घातल्या. बोरकर यांचच्यावतीने ऍड. राजीव गोम्स यांनी तर सरकारी पक्षातर्फे ऍड. अनुराधा तळावलीकर यांनी बाजू मांडली.