रणजीचा दर्जा घसरलेला ः रैना

0
125

रणजी क्रिकेटचा दर्जा घसरल्यामुळेच बीसीसीआयने करारबद्ध नसलेल्या भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याचा परवानगी द्यावी, असे भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना याने काल सोमवारी म्हटले. मागील महिन्यात त्याने बीसीसीआयकडे विदेशात खेळण्यासाठी परवागनीची याचना केली होती. त्यावेळी बीसीसीआयने त्याला रणजी स्पर्धेत खेळून स्वतःला सिद्ध करण्यास सांगितले होते.

आता त्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा आपले म्हणणे मांडले आहे. आयपीएलद्वारे मिळणारा पैसा माझ्यासाठी पुरेसा आहे. आयपीएलच्या एका मोसमातून होणारी कमाई विदेशातील लीग स्पर्धा खेळून मिळणार्‍या पैशापेक्षा कित्येकपटीने जास्त आहे. मला पैशाची गरज नसून विदेश लीगमधून मिळणारा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे, असे रैनाने म्हटले आहे.