येत्या तीन दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता

0
234

येथील हवामान खात्याने २ ते ४ जुलै दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा काल दिला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात काणकोण येथे सर्वाधिक ५.३१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील आठ दिवसात पावसाचे प्रमाण कमी होते. सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून काल मंगळवारी सायंकाळी राज्यात जोरदार पाऊस पडला. मागील चोवीस तासांत १.६७ इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण येथे जोरदार पावसाची नोंद झाली. मुरगाव येथे २.९६ इंच, दाभोळी येथे २.०२ इंच, फोंडा येथे १.९० इंच, वाळपई येथे १.५० इंच, मडगाव येथे १.१८ इंच, केपे येथे १.२२ इंच, सांगे येथे १.१७ इंच पावसाची नोंद झाली आहे.