येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध

0
126

सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी काल सकाळी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे आमदार सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचा दावा करीत बहुमत सिद्ध करण्यास प्रत्यक्षात तितका कालावधी लागणार नसल्याचे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

येडियुरप्पा यांनी काल सकाळी ९ वाजता राजभवनाच्या लॉनवरील ग्लास हाऊसमध्ये कडेकोट बंदोबस्तात कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तिसर्‍यांदा शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे. पी. नड्डा, भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

कुमारस्वामींचे सूचक विधान
जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी कोणासोबत जायचे, नेमके काय करायचे हे काल रात्री उशिरा ठरवू असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे रात्री नेमके काय खलबते होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आम्हांला अनेक सल्ले दिले जात आहेत. त्यांपैकी एक राष्ट्रपती भवनासमोर केलेले आंदोलन थांबवण्याचाही होता असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.