युवा विकास संघातील खेळाडूंचा धेंपो स्पोटर्‌‌स क्लबकडून गौरव

0
117

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने त्यांच्या १४ ते २० वर्षांपर्यंतच्या युवा युवा विकास संघांतील खेळाडूंसाठी प्रथमच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात एकूण १६ युवा फुटबॉलपटूंना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या सोहळ्याला धेंपो स्पोटर्‌‌स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, वरिष्ठ संघ मुख्य प्रशिक्षक समिर नाईक व क्लबच्या युवा विकास संघांचे तांत्रिक संचालक कर्नागरन नायडू यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना धेंपो स्पोटर्‌‌स क्लबच्या युवा संघांनी या मोसमातील अंडर-१४ आणि अंडर-१८ लीगची जेतेपदे प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी गोव्यातीच्या तळागळातील आणि युवा फुटबॉलचा विकासाप्रती आपण बांधिल असल्याचे स्पष्ट करून वरिष्ठ संघात आपल्या खेळाडूंची विक्रमी वर्णी लावण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले. तांत्रिक संचालक कात्झ नायडू यांनी टेक्निकल स्टाफच्या संपूर्ण मोसमातील बांधिलकीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी उच्च दर्जा राखण्यासाठी या मोसमात कठोर मेहनत घेतल्याचे सांगितले.

पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले युवा फुटबॉलपटू पुढीलप्रमाणे ः अंडर-१४ ः उत्कृष्ट गोलरक्षक – साईल परुळेकर, उत्कृष्ट बचावपटू – शिवम पांडे, उत्कृष्ट मध्यपटू – ड्‌वाय नेटो, उत्कृष्ट स्ट्रायकर – श्रेयश नाईक, अंडर-१६ ः उत्कृष्ट गोलरक्षक – निलि करियप्पा, उत्कृष्ट बचावपटू – मॅक्झिमो डिकॉस्ता, उत्कृष्ट मध्यपटू – स्टीवर्ट डिमेलो, उत्कृष्ट स्ट्रायकर – फेड्रिच फर्नांडि, अंडर-१८ ः उत्कृष्ट गोलरक्षक – मंजुनाथ हिरेबुरकर, उत्कृष्ट बचावपटू – रायन पिंटो, उत्कृष्ट मध्यपटू – लॅरिल मस्कारेन्हास, उत्कृष्ट स्ट्रायकर – आरोन आल्वारीस, अंडर-२० व प्रथम विभाग ः उत्कृष्ट गोलरक्षक – वसिम शेख, उत्कृष्ट बचावपटू – ब्रिवन डायस, उत्कृष्ट मध्यपटू – फ्लॉयड परेरा, उत्कृष्ट स्ट्रायकर – बॅजिओ फर्नांडिस.