युवकांनो, स्वच्छ भारत इंटर्नशीपमध्ये सहभागी व्हा!

0
125
  • नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान)

भारत सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास, पेयजल विभाग या तीन-चार मंत्रालयांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप २०१८’ उपक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसीचे, एनएसएसचे तरुण, नेहरू युवा केंद्रातील तरुण, या सर्वांसाठी ही एक संधी आहे

माझ्या प्रिय देशबांधवांनो ! नमस्कार,
मागील महिन्यात ‘मन की बात’ मध्ये मी देशवासियांना विशेषतः आपल्या युवकांना फिट इंडियाचे आवाहन केले होते आणि मी प्रत्येकाला आमंत्रण दिले होते. या! फिट इंडिया मध्ये सहभागी व्हा, ‘फिट इंडिया’चे प्रतिनिधित्व करा. आणि मला खूप आनंद होत आहे की, मोठ्या उत्साहाने लोक यात सहभागी होत आहेत. बर्‍याच लोकांनी पत्रे पाठविली आहेत, सोशल मिडीयावर आपला आरोग्याचा मंत्र ‘फिट इंडिया’ च्या गाथा शेअर केल्या आहेत.

माझ्या तरुण मित्रांनो! आता आपण परीक्षा, परीक्षा, परीक्षा यातून बाहेर पडून सुट्यांची काळजी करत असाल. सुट्टी कशी घालवायची, कुठे जायचे याचा विचार करत असाल. तुम्हाला एका नवीन कामासाठी आमंत्रित करण्यासाठी आज मी तुमच्याशी बोलू इच्छितो. मी पाहिले आहे की, अनेक तरुण सुटीत नवीन काहीतरी शिकत असतात. समर इंटर्नशिपचे महत्त्व वाढत आहे आणि तरुणवर्ग देखील ते शोधत आहेत, आणि एरव्हीही इंटर्नशिपमध्ये एक नवीन अनुभव मिळतो. माझ्या तरुण मित्रांनो, एका विशेष इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याची मी तुम्हाला विनंती करतो. भारत सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास, पेयजल विभाग या तीन-चार मंत्रालयांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप २०१८’ उपक्रम सुरू केला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसीचे तरुण, एनएसएसचे तरुण, नेहरू युवा केंद्रातील तरुण, जे काही करू इच्छितात, समाजात बदल घडवून आणण्यासाठी जे सहभागी होऊ इच्छितात, निमित्त बनू इच्छितात; एक सकारात्मक ऊर्जा घेऊन समाजामध्ये काहीतरी करण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांसाठी ही एक संधी आहे आणि यामुळे स्वच्छतेला देखील बळकटी मिळेल.
जेव्हा आपण २ ऑक्टोबर पासून महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी करू, त्या आधी आपण काहीतरी केले याचा आपला आनंद मिळेल आणि मी हे देखील सांगतो की जे सर्वोत्तम प्रशिक्षक असतील, ज्यांनी महाविद्यालयात उत्तम काम केले असेल, विद्यापीठांमध्ये केले असेल अशा सर्वांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. ही इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणार्‍या प्रत्येक प्रशिक्षकाला ‘स्वच्छ भारत मिशन’ द्वारे एक प्रशस्तीपत्र दिले जाईल. एवढेच नाही तर जे प्रशिक्षक हे पूर्ण करतील त्यांना युजीसी दोन क्रेडीट पॉईंट देखील देणार आहे. मी विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि तरुणांना पुन्हा एकदा या इंटर्नशिपचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही मायगोव्ह ऍपवर ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ साठी नोंदणी करू शकता. मला आशा आहे की, आपले तरुण स्वच्छतेच्या या आंदोलनाला नक्की यशस्वी करतील. मी आपल्या प्रयत्नांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे आपण आपली माहिती पाठवा, कथा पाठवा , फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा.

चला! एक नवीन अनुभव घेण्यासाठी या सुट्‌ट्यांचा एक संधी म्हणून उपयोग करूया.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ! जेव्हा संधी मिळते तेव्हा मी दूरदर्शनवरील ‘गुड न्यूज इंडिया’ हा कार्यक्रम नक्की पाहतो आणि मी देशवासियांनाही आवाहन करीन की तुम्हीपण ‘गुड न्यूज इंडिया’ पाहावे. आपल्या देशातल्या कोणत्या कानाकोपर्‍यात किती लोक अनेक प्रयत्न करून चांगले काम करत आहेत, चांगल्या गोष्टी घडत आहेत याची आपल्याला तेथे माहिती मिळते. मी मागे पहिले की, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी नि:स्वार्थ भावनेने काम करणार्‍या तरुणांची गोष्ट यात दाखवत होते. तरुणांच्या या समूहाने रस्त्यावरील आणि झोपडपट्टीत राहणार्‍या मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठे अभियान सुरू केले आहे. सुरवातीला रस्त्यावर भीक मागणार्‍या किंवा छोटे मोठे काम करणार्‍या मुलांच्या परिस्थितीने त्यांना इतके हेलावून सोडले की त्यांनी या कामात स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले.
बंधू-भगिनींनो, उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशातील काही शेतकरी देशभरातील शेतकर्‍यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. एकत्रित प्रयत्नांमधून त्यांनी केवळ स्वतःचेच नाहीतर आपल्या क्षेत्राचेही भाग्य बदलले आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर इथे मुख्यत्वे मांडवा, चौलाईत मका किंवा जवाचे पीक घेतले जाते. डोंगराळ प्रदेशामुळे, शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळत नव्हती, परंतु कापकोट तालुक्यातील शेतकर्‍यांनी ही पिके थेट बाजारात विकून तोटा सहन करण्याऐवजी, त्यांनी मूल्यवर्धित मार्ग अवलंबला.

त्यांनी काय केलं, शेतातील या पिकापासून बिस्किटे बनवायला सुरुवात केली आणि ती बिस्किटे विकायला सुरुवात केली. हा भाग लोहसमृद्ध आहे असा मजबूत विश्वास आहे. आणि लोहयुक्त बिस्किटे गर्भवती महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. या शेतकर्‍यांनी मुन्नार गावात एक सहकारी संस्था स्थापन केली आहे आणि तिथे बिस्किटे तयार करण्यासाठी कारखाना उघडला आहे. शेतकर्‍यांच्या धैर्याची दखल घेत प्रशासनानेही याला राष्ट्रीय उपजीविका अभियानाशी जोडले आहे. ही बिस्किटे आता फक्त बागेश्वर जिल्ह्यातील जवळजवळ पन्नास अंगणवाडी केंद्रातच नव्हे, तर अल्मोडा आणि कौसानीपर्यंत वितरित केली जात आहेत. शेतकर्‍यांच्या कठोर परिश्रमामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल केवळ १० ते १५ लाख रुपयांपर्यंत पोहचली नाही, तर ९०० पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगाराची संधी मिळाल्यामुळे जिल्ह्यातून होणारे पलायन देखील कमी झाले आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो! जेव्हा आपण ऐकतो की भविष्यात जगामध्ये पाण्यासाठी युद्ध होतील. प्रत्येकजण ही गोष्ट बोलतो, परंतु आपली कोणतीच जबाबदारी नाही का? जलसंवर्धन ही सामाजिक जबाबदारी असावी असे आपल्याला वाटत नाही का? प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असली पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण कसा वाचवू शकतो आणि आपल्याला माहित आहे की भारतीयांसाठी जल संवर्धन हा नवीन विषय नाही, तो पुस्तकांचा विषय नाही, हा भाषेचा विषय नाही. शतकानुशतके आपल्या पूर्वजांनी हे करून दाखवले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कशाप्रकारे वाचवता येईल यासाठी त्यांनी नवीन नवीन उपाय शोधले आहेत.

आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपल्या पूर्वजांच्या जल संवर्धन अभियानाचे हे जिवंत पुरावे देखील आहेत. मी असे म्हणेन की पुन्हा एकदा एप्रिल, मे, जून, जुलै आपल्या समोर आहेत, आपण पाणी संचय, जलसंवर्धनसाठी आपण देखील काही जबाबदार्‍या घेतल्या पाहिजेत, आपणही काही योजना तयार केल्या पाहिजेत, आपण देखील काहीतरीही करून दाखवूया! आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी, शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी, सक्षम भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक युवकाने योगदान देण्याचा संकल्प करावा. आपल्या शक्तीला भारताच्या शक्तीमध्ये सहभागी करा. जो प्रवास अटलजींनी सुरु केला होता, त्याला पुढे घेऊन जाण्याचा एक नवीन आनंद, नवीन समाधान आपण देखील प्राप्त करू शकू.