यशस्वी होण्यासाठी अपयशातून शिका

0
135

>> परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधानांचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अपयशातून शिका असा सल्ला दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी आगामी परीक्षांच्या निमित्ताने काल विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संघाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे याने वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यात जखमी असूनही केलेली खेळी आणि राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणने
ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात केलेल्या ३७६ धावांच्या भागीदारीची उदाहरणे दिली. सकारात्मक विचार आणि प्रेरणेची ही शक्ती असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दोन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाच विषयांवरील निबंधांच्या माध्यमातून १०५० विद्यार्थ्यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.