यजमान नेदरलँड्‌सचा निसटता विजय

0
117

यज’ान नेदरलँड्‌सने तिरंगी ’ालिकेतील काल ’ंगळवारी झालेल्या पहिल्या सा’न्यात आयर्लंडचा ४ धावांनी पराभव केला. प्रथ’ फलंदाजी करताना नेदरलँड्‌सने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १४४ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर आयर्लंडचा डाव १४० धावांत रोखला.

आयर्लंडचा कर्णधार गॅरी विल्सन याने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. कर्णधार पीटर सिलार (२८ चेंडूंत ३५), मॅक्स ओडोड (१४ चेंडूंत २०), बास डी लिड (३५ चेंडूंत ३३) यांच्या जोरावर आयर्लंडने दीडशेच्या आसपास मजल मारली. टी-२० पदार्पण करणार्‍या सिमी सिंग याने २३ धावांत ३ तर बॅरी मॅकार्थीने २६ धावांत ३ गडी बाद करत प्रभावी कामगिरी केली. विजयासाठी माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या आघाडी फळीतील एकाही खेळाडूला खेळपट्टीवर टिकून राहणे जमले नाही. यामुळे त्यांची ८ बाद ९६ अशी केविलवाणी स्थिती झाली. सिमी सिंग याने केवळ २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५७ धावा चोपत सामन्यात रंगत आणली. बॅरी मॅकार्थीने ६ चेंडूंत नाबाद ११ धावा करून त्याला चांगली साथ दिली. शेवटच्या षटकात विजयासाठी १२ धावांची आवश्यकता असताना अनुभवी वेन मीकेरन याने केवळ ८ धावा देत सामना नेदरलँड्‌सच्या नावे केला. याच मैदानावर या दोन्ही संघात आज मालिकेतील दुसरा सामना खेळविला जाणार आहे.