म्हापसा शहर आराखडा; कृतिदलाची स्थापना

0
101

उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने म्हापसा येथील शहर नियोजन योजनेचा आराखड्याच्या कामाला गती देण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. या संबंधीची सूचना प्राधिकरणाच्यावतीने जारी करण्यात आली आहे. डाऊन टाऊन म्हापसा टप्पा – १ आणि कामरखाजन आणि गावसवाडा टप्पा -२ ची तयारी व कार्यवाहीसाठी या कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

या कृती दलाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधीर कांदोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कृती दलामध्ये शेतकरी महाबळेश्‍वर गडेकर, नेल्सन कार्व्हालो, म्हापसा कोमुनिदादचे ऍटर्नी रायन बाग्रांझा, सर्वेक्षण आणि जमीन नोंदणी विभागाचे निरीक्षक राजेश पै कुचेलकर, आर्कीटेक्ट आश्‍विनकुमार प्रभू यांचा समावेश आहे. नगर नियोजन खात्याचे उपनगर नियोजक शेख अली अहमद यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.