म्हापशात चालत्या स्कूटरवर झाड पडून पती-पत्नी जखमी

0
100

म्हापसा-करासवाडा येथील मुख्य रस्त्यावर काल दुपारी आपल्या स्कुटरवरून सावंतवाडी येथील शांताराम म्हावळकर हे पत्नीसमवेत जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेले भले मोठे झाड त्यांच्या स्कूटवर पडल्याने शांताराम म्हावळकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या. त्यांच्यावर म्हापसा आझीलोमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शांताराम म्हावळकर हे एमएच ०७ एडी ०५४२ ही स्कुटर घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे झाड त्यांच्या स्कुटरवर पडल्याने गंभीर मार लागल्याने तातडीने म्हापसा गोवा येथे उपचारासाठी दाखल करून नंतर त्यांना बांबोळी येथे पाठवण्यात आल्याचे म्हापसा पोलीस स्थानकातून सांगण्यात
आले.