गोव्यात पुन्हा मुसळधार पाऊस

0
153

>> पणजीत झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

दोन दिवस उसंत घेतलेला पाऊस पुन्हा एकदा मुसळधार कोसळत असून ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे लोकांचे हाल झाले. पणजी येथील आंबेडकर उद्यानाजवळ एक भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ बंद होती. दरम्यान सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस बरसल्याने ठिकठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. सायंकाळी ५.३० पर्यंत गोव्यात २९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
कुडचडेतील, कामराळ येथे रेल्वे रुळावर माडाचे झाड कोसळून पडण्याची घटना घडली. यावेळी लोंडा मार्गावरील एकही रेल्वे गाडी सुरू नसल्यामुळे सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच अन्य ठिकाणीही पडझडीच्या घटना घडल्या.