म्हादई अभयारण्य व्याघ्र अभयारण्य घोषित करण्याची केंद्राची शिफारस

0
124

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याने म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त द्वितीय सदस्यीय चौकशी समितीने म्हादई अभयारण्य व्याघ्र अभयारण्य घोषित करण्याची शिफारस केली आहे.

या द्वितीय सदस्यीय समितीच्या सदस्यांनी गोळावली-सत्तरी भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून समस्या, माहिती जाणून घेतली होती. या समितीने आपला चौकशी अहवाल केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाला सादर केला आहे.

सीमा निश्‍चित कराव्यात
या अहवालामध्ये म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र जाहीर करण्याची प्रमुख शिफारस करण्यात आली आहे. म्हादई अभयारण्याची घोषणा करून कित्येक वर्षे उलटली तरी अभयारण्याच्या सीमारेषा निश्‍चित करण्यात आल्या नसल्याचे आढळून आले आहे. या अभयारण्याच्या सीमारेषा निश्‍चित कराव्यात, म्हादई अभयारण्यात वाघाचे अस्तित्व असल्याचे आढळून आल्यानंतर वाघाबाबत माहितीसाठी कॅमेरे बसविण्यात आले. परंतु, वाघांच्या रक्षणासाठी आवश्यक उपाय योजना हाती घेण्यात आल्या नाही, असे चौकशी समितीला आढळून आले आहे.