… म्हणून नितीशकुमार भाजपला शरण : लालू

0
88

राष्ट्रीय जनता दलातर्फे येथे आयोजित एका रॅलीत या पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सृजन घोटाळाप्रकरणी तुरुंगात जावे लागण्याच्या भीतीनेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील तत्कालीन महायुती तोडली व भाजपला शरण गेले अशी घणाघाती टीका केली.
दिल्लीत भाजपला सृजन घोटाळ्याचा सुगावा लागला होता व त्यांनी नितीशकुमार यांना धमकीवजा संदेश दिला होता. या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागेल असा हा संदेश होता. या भीतीमुळेच नितीशकुमार भाजपला शरण गेले असा दावा लालू यांनी केला. नितीशकुमार यांना सत्तेच्या खुर्चीचा मोह सुटत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच त्यांना प्राण सोडायचे आहेत, अशी टीका त्यांनी केली. सृजन घोटाळाप्रकरणी नितीशकुमार तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही जबाबदार आहेत असे लालू म्हणाले. तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणारच असेही ते म्हणाले. गरीब, दलीत व मागास वर्गीयांच्या पाठिंब्यावर तेजस्वी मुख्यमंत्री होतील असा दावा त्यांनी केला.