मोहनदास पै विद्याधिराज पुरस्काराने सन्मानित

0
140

विद्याधिराज पुरस्कार बेंगलोर येथील अक्षय पात्राचे जनक टी.वी. मोहनदास पै तर गंगोळळी येथील एच गणेश कामथ व नगर सदाशिव नायक याना सामाजिक कार्याच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल जीवोत्तम पुरस्काराने पर्तगाळी मठात काल आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले. पर्तगाळी येथील वटवृक्षाची प्रतिकृती, रोख पंचवीस हजार रू. मानपत्र असे विद्याधिराज पुरस्काराचे स्वरूप असून दक्षिणाभिमुख हनुमंताची प्रतिकृती, मानपत्र आणि रोख १५ हजार रू. असे जीवोत्तम पुरस्काराचे स्वरूप आहे.

पर्तगाळी मठाधिश श्र्‌रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज, शिष्यस्वामी श्र्‌रीमद् विद्याधिश स्वामी महाराज, मठ समितीचे अध्यक्ष श्र्‌रीनिवास धेंपो यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार पर्तगाळ मठात आयोजित समारंभात प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आर. आर. कामथ, प्रदीप पै हे पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर आपल्या प्रवचनात विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराजांनी संस्कृती रक्षणाचे महत्व विषद करून गुरू कर्म आणि देवभक्तीचे आचरण केल्यासच संस्कृतीचे संवर्धन होत असते. असे मत व्यक्त केले.

श्र्‌रमिक असला तरी सर्वत्र ज्ञानाचे पूजन केले जाते. त्यामुळे ज्ञानी व्यक्तीनांच पुरस्कार मिळत असतो. त्यासाठी पालकांनी केवळ लौकिक शिक्षणाकडे भर न देता आपल्या मुलांना संस्कारक्षम शिक्षण देण्याकडे लक्ष द्यायला हवे. भारतीय संस्कृती ही सर्व श्र्‌रेष्ठ असून त्याचा विसर पडता कामा नये. पर्तगाळी मठाधिश शिस्त प्रिय, कार्यकुशल, कर्मयोगी आणि सिद्धयोगी असून दुखितांचे अ़श्र्‌रू पुसण्याचे काम त्यानी केले आहे. विघटित झालेल्या समाज बांधवाना एकत्रित करतानाच धर्म, अध्यापन, आणि संस्कृती वर्धनाचे काम केले आहे असे सांगून विद्याधिराज पुरस्कार आणि जीवोत्तम पुरस्काराने सन्मानित केलेल्या समाज बांधवांचा आपल्या स्वागतपर भाषणात मठ समितीचे अध्यक्ष श्र्‌रीनिवास धेंपो यानी कौतुक केले.