मोप जागेतील झाडे तोडण्यास तूर्त बंदी

0
117

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नियोजित मोपा विमानतळ जागेतील झाडे पुढील आदेशापर्यंत तोडू नयेत, असा आदेश दिला आहे. खंडपीठाने विमानतळ जागेतील तोडण्यात येणार्‍या झाडांवर क्रमांक नोंद करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली आहे.

मोपा विमानतळ जागेतील झाडे कापणीबाबत फेडरेशन ऑफ रेनबो वॉरियर्स या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार आहे. नियोजित मोपा विमानतळ जागेतील सुमारे २१,७०३ झाडे कापण्यासाठी वन खात्याने ६ फेब्रुवारीला मान्यता दिली होती. मोपा विमानतळ परिसरातील कापण्यात येणार्‍या झाडांवर क्रमांक घातले जात नसल्याने रेनबो वॉरियर्स या संस्थेने झाडे कापणीला आक्षेप घेऊन याचिका दाखल केली होती.