मोदी तीन देशांच्या दौर्‍यावर

0
163

पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौर्‍यावर रवाना झाले. काल जकार्ता (इंडोनेशिया) येथे पोचल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मोदी प्रथमच इंडोनेशियाला भेट देत असून आज ते राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेऊन व्यापार, गुंतवणूक आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा करतील.
या दौर्‍यात मोदी सिंगापूरमध्ये गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. मलेशियाची राजधानी क्वालंपूरमध्ये मोदी जगातले सर्वांत वृद्ध पंतप्रधान महाथेर मोहम्मद यांची भेट घेणार आहेत. ही भेट ३१ मे रोजी होणार आहे.