मोदींच्या नेतृत्वाखालील समितीवर खर्गेंची निवड

0
116

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त निवडण्याच्या तीन सदस्यीय समितीवर कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खर्गे यांची निवड झाल्याचे वृत्त आहे.या समितीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख आहेत. तर संरक्षणमंत्री अरूण जेटली हे दुसरे सदस्य आहेत. तिसरे सदस्य म्हणून खर्गे यांची निवड कायदा मंत्रालयाच्या सल्ल्यावरून करण्यात आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेता कोण याविषयी संदिग्धता असल्याने हा सल्ला घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
माहिती हक्क कायद्यानुसार मुख्य माहिती आयुक्त निवडण्यासाठी पंतप्रधान (अध्यक्ष), कॅबिनेट मंत्री व विरोधी पक्षनेता अशी त्रिसदस्यीय समिती असणे आवश्यक आहे. माहिती हक्क कायद्यातील तरतुदीनुसार जेव्हा सभागृहातील विरोधी नेत्याला मान्यता मिळालेली नसते अशा वेळी त्या सभागृहातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता मानला जावा.